लंडनला 5 दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी आ.मंगेश चव्हाण रवाना

0
37
लंडनला 5 दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी आ.मंगेश चव्हाण रवाना-www.saimatlive.com

साईमत चाळीसगाव प्रतिनिधी

जगभरातील विविध क्षेत्रांचा, तंत्रज्ञानाचा तसेच समाजोपयोगी धोरणांचा अभ्यास करण्यासाठी विधीमंडळातील आमदारांचे अभ्यास दौरे आयोजित केले जातात. यावर्षी लंडन येथील जगप्रसिद्ध वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड निमंत्रणावरून महाराष्ट्रातील 12 आमदारांचे शिष्टमंडळ सोमवारी, 20 ते शनिवारी, 25 नोव्हेंबर 2023 दरम्यान ब्रिटन (युके) येथे अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे. त्यात चाळीसगाव मतदारसंघाचे आ.मंगेश चव्हाण यांची निवड झाली आहे.

ते रविवारी, 19 रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सकाळच्या विमानाने लंडनला रवाना झाले आहेत. प्रदीर्घ कालावधीनंतर विधिमंडळाच्या अभ्यास दौऱ्यासाठी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळाल्याने आ. मंगेश चव्हाण यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.अभ्यास दौऱ्याच्या निमित्त वेल्स, यूके येथील विद्यापीठात सुशासन आणि सार्वजनिक धोरण विषयावरील कार्यकारी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

वेल्समधील लॅम्पीटर कॅम्पसमध्ये, विविध सांस्कृतिक भेटींबरोबरच सुशासन आणि सार्वजनिक धोरण विषयांवर आणि आसपासच्या अनेक दिवसांच्या कार्यशाळांचा भाग आमदार असतील. कार्यक्रमात कार्डिफमधील सेनेड असेंब्लीला आणि वेस्टमिन्स्टर येथील संसदेच्या सभागृहांना भेट देणे समाविष्ट आहे. कार्यक्रमाची समाप्ती व्हाईट हॉलमधील नॅशनल लिबरल क्लबमध्ये औपचारिक डिनरद्वारे केली जाणार आहे.

शिवरायांची वाघनखे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक, महात्मा गांधी यांच्या स्मारकांना देणार भेटी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघ नखांनी अफजलखानाचा वध केला होता, ते वाघ नखे ठेवण्यात आलेल्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमला आमदारांचे शिष्टमंडळ भेट देणार आहे. आपल्या महाराष्ट्राच्या एका दैदिप्यमान अश्या इतिहासाची खून असणाऱ्या शिवरायांच्या वाघ नखांचे दर्शन यानिमित्त होईल, यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील निवासस्थानाचे भव्य स्मारकात रुपांतर करण्यात आले आहे. त्या मारकाला तसेच लंडन येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यालाही आमदारांचे शिष्टमंडळ अभिवादन करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here