सभेत झोपणारा माणूस पक्षाची बाजू घेतोय, आदित्य अन् उद्धव ठाकरेंवर न बोलणाऱ्या कदमांचा निशाणा कोणावर?

0
25

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  

उदय सामंत यांच्या गाडीवर काल कात्रजमध्ये संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला. यामध्ये सामंतांच्या गाडीची काच फुटली आहे. पण अशा गोष्टींकडे लक्ष न देता उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामांवर लक्ष केंद्रीत करावे असे मत कदम यांनी व्यक्त केले आहे. सामंत यांनी आपल्या मतदारसंघात तर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाकडे लक्ष दिल्यास असल्या छोट्या-मोठ्या गोष्टींना अधिकचे महत्वही मिळणार नसल्याचे कदम म्हणाले आहेत.

मुंबई : बंडखोर आमदारांबाबत (Shiv sena) शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे याबाबत कोणी प्रतिक्रिया देत नसले तरी (Ramdas Kadam) रामदास कदम यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यावर मात्र खोचक टिका केली आहे. तर दुसरीकडे आपण आदित्य अन् उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काही बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. सध्या (Superme Court) सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरु असून एकमेकांवर टिका करुन अधिकचा असंतोष निर्माण करण्यापेक्षा त्याबाबत प्रतिक्रिया देणेच टाळले जात आहे. असे असले तरी विधीमंडळात असलेल्या बहुमताचा विचार झाला तर शिंदे गटाकडे 51 आणि दुसऱ्या बाजूला 15 आमदार असल्याचेही कदमांनी स्पष्ट केले आहे. सुनावणीनंतर सुभाष देसाई यांनी पक्षाने आपले म्हणणे ठामपणे मांडले असल्याचे सांगताच त्याच्या वर अशाप्रकारे रामदास कदम यांनी टिका केली आहे.

म्हणून मला आश्चर्य वाटले…!

शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत अनेकांनी शिंदे गट जवळ केला आहे. असे असतानाही काही नेते हे थेट आदित्य अन् उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्यास टाळाटाळ करीत आहे तर इतरांना टार्गेट केले जात आहे. सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. ते प्रत्येक बैठकीत आणि सभेत झोपा काढायचे ते आता पक्षाची बाजू मांडत असल्याचे म्हणत रामदास कदम यांनी त्यांना टोला लगावला आहे. त्यांनी आता सर्वकाही होऊन गेल्यावर आपले मत मांडले याचेही मला आश्चर्य वाटल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोर्टातील निकाल लांबणीवर गेला असला तरी शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र हे सुरुच आहे.

हल्ल्याकडे लक्ष न देता विकासकामावर लक्ष द्यावे

उदय सामंत यांच्या गाडीवर काल कात्रजमध्ये संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला. यामध्ये सामंतांच्या गाडीची काच फुटली आहे. पण अशा गोष्टींकडे लक्ष न देता उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामांवर लक्ष केंद्रीत करावे असे मत कदम यांनी व्यक्त केले आहे. सामंत यांनी आपल्या मतदारसंघात तर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाकडे लक्ष दिल्यास असल्या छोट्या-मोठ्या गोष्टींना अधिकचे महत्वही मिळणार नसल्याचे कदम म्हणाले आहेत. सध्या त्यांच्या हातामध्ये काही नसल्यामुळेच असे भ्याड हल्ले केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here