गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम

0
29

साईमत/ न्यूज नेटवर्क/मलकापूर :

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष बच्चू कडू यांच्या जनसेवेच्या कार्याला साजेसे असे कार्य मलकापूर येथे प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. अशातच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन ‘समतेचे निळे वादळ’ सामाजिक संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांनी केले.

शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक श्री आत्मानंद दरबार जैन मराठी प्राथमिक पूर्व माध्यमिक शाळा येथे प्रहार जनशक्ती पक्ष आणि महेश अर्बन को.ऑप. क्रेडीट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते. यावेळी रमेशसिंह राजपूत, बी.जे.संचेती लोकसेवा ट्रस्टचे अमरकुमार संचेती, महेश अर्बनचे संचालक धिरज मुंधडा, पत्रकार बाळासाहेब जगताप, हरीभाऊ गोसावी, विरसिंहदादा राजपूत, धनश्री काटीकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ता संभाजी शिर्वे, महेश अर्बनचे व्यवस्थापक सुनील अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी प्रहारचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, प्रा.संजय पाटील, शहराध्यक्ष शालीकराम पाटील, तालुका प्रमुख अजीत फुंदे, बलराम बावस्कर, उमेश जाधव, अमोल पाटील, अशोक गाढवे, निलेश चोपडे, अपरेश तुपकरी, पत्रकार करण शिरसवाल, प्रकाश थाटे, मुख्याध्यापक अमोल तेजनकर, दीपक अाढाव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here