मालकावर चाकूहल्ला करणाऱ्या मजूराला सक्तमजुरीची शिक्षा

0
11
मालकावर चाकूहल्ला करणाऱ्या मजूराला सक्तमजुरीची शिक्षा-saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी

मजुरीचे पैसे घेण्याच्या कारणावरून दुकान मालकावर चाकूहल्ला केल्याप्रकरणी आरोपी दीपक मधुकर दुसाने (रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) याला जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.एन. खडसे यांनी दोन वर्ष सक्तमजुरीची आणि 2 हजारांचा दंड अशी शिक्षा शनिवारी 1 जुलै रोजी दुपारी 2 वाजता सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगावातील वाघ नगर परिसरात सागर शंकर भामरे यांचे वाघ नगर स्टॉप येथे साईदर्शन फेब्रीकेशन वेल्डींग दुकान आहे. या दुकानावर आरोपी दीपक दुसाने हा कामाला होता. त्यानंतर त्याने काम सोडले होते. 25 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 9 वाजता दीपक दुसाने हा दुकानावर आला. त्याने सागर भामरे यांना कामचे राहिलेले पैसे मागितले. त्यावर सागर यांनी दुपारी 12 वाजता पैसे घेवून जा, असे सांगितले.
याचा राग आल्याने दीपक दुसाने याने हातातील चाकूने वार करून सागर भामरे यांना जखमी केले. त्यानंतर पसार झाला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधिश डी.एन.खडसे यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षिदारांची साक्ष घेण्यात आली.  या खटल्यात सागर भामरे, दुकानात काम करणारे कारागीर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यानुसार न्यायमूर्तींनी दीपक दुसाने याला दोषी ठरवत वेगवेगळ्या कलमान्वये दोन वर्ष सक्तमजुरी आणि 2 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. निलेश चौधरी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here