आ.किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळण्यासाठी ‘श्रीरामाला’ घातले साकडे

0
49

पाचोऱ्यातील पुरातन श्रीराम मंदिरात समर्थकांकडून महाआरती

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी

पाचोरा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांनी विजयाची ‘हॅट्‌ट्रिक’ मिळवित ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. त्यांच्या कामांचा आलेख पाहता त्यांची नवीन सरकारमध्ये मंत्रीपदी वर्णी लागावी, यासाठी पाचोरा तालुका शिवसेनेचे आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हिवरा नदी काठावरील पुरातन श्रीराम मंदिरात सोमवारी, २५ रोजी सकाळी साडे नऊ वाजता महाआरती करून प्रभू ‘श्रीरामाला’ साकडे घातले आहे.

पाचोरा मतदार संघातून दोनदा आमदारकी भूषविलेले महायुतीचे कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीत ९६ हजार ९७७ मते मिळवित सर्व विरोधकांना पराभवाची धूळ चारत ३८ हजार ३८८ मतांची आघाडी मिळविली. त्यांनी मतदार संघात केलेल्या तीन हजार कोटींच्या सर्वांगिण विकासाची जाण ठेवून सर्व घटकांच्या मतदारांनी त्यांना तिसऱ्यांदा बहुमताने निवडून दिले आहे. यापुढेही मतदार संघ ‘सुजलाम्-सुफलाम्‌’ करण्यासाठी आ.किशोर आप्पा पाटील यांना मंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

यांची होती उपस्थिती

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, डॉ. भरत पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पद्ममसिंग पाटील, माजी नगरसेवक दत्ता जडे, बापू हटकर, जय बारवकर, युवासेना शहर प्रमुख सूरज शिंदे, छोटू चौधरी मंदाकिनी पारोचे यांच्यासह युवासेनेचे कार्यकर्ते, शिवसैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here