तीस वर्षे आमदारकी भोगूनही आ.खडसेंना मतदार संघाचा विकास करता आला नाही: आ.चंद्रकांत पाटील

0
28

आठ दिवसात मुक्ताईनगर शहर टपरी मुक्त करण्याची ‘घोषणा’ तर आ.खडसे यांची कृष्णकृत्ये समोर आणण्याची केली ‘गर्जना’

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :

विधान परिषदेचे आ.एकनाथराव खडसे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ.चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देऊन आरोप केले होते. त्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी रविवारी, ८ सप्टेंबर रोजी आ.चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात आ.चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुंढोळदे ते सूलवाडी पूलासाठी ५० कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. जमिनी अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे. पूल लवकरात लवकर पूर्ण होईल मोठी कामे करण्यासाठी वेळ लागतोच तुमच्या काळातील म्हणजे २०१६ मधील कामे आजतागायतही पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यात बोदवडची ओडीए प्रकल्प योजना आहे. मी मतदार संघाच्या विकासासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. परंतु ज्यांनी तीस वर्षे आमदारकी उपभोगली. तालुक्यात दोन-दोन नद्या असूनही मुक्ताईनगर तालुक्यातील ५० टक्के गावे अद्यापही पूर्ण सिंचनाखाली येऊ शकलेली नाहीत. ज्यांनी तीस वर्षे आमदारकी उपभोगली त्यांना हे करता आले नाही. त्याच्यासारखे दुर्दैव कोणते आहे ? असा प्रश्नही आ.चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारा उपस्थित केला.

बोदवड तालुक्यासाठी पाणीपुरवठा योजना ९५ लाखांची आहे. ती ९२ लाखाची नाही. इंदोर-संभाजीनगर रस्ता केंद्राचा आहे. तो एकनाथराव खडसे यांनी कसा केला? बोदवड मुक्ताईनगर तालुका निर्मिती ही प्रशासकीय बाब आहे, ती निरंतर चालणारी बाब आहे. कोणतेही सरकार आले तरी गरजेनुसार भौगोलिक क्षेत्रानुसार जिल्हा निर्मिती तालुका निर्मिती होत असते. त्याचे श्रेय घेऊ नये, व्यापारी संकुलाची निविदा झाली आहे. आठ दिवसात मुक्ताईनगर शहर टपरीमुक्त करणार तुमची मगरूरी लोक गाडतील, असेही ते म्हणाले.

५० फूट उंचीचा शिवरायांचा उभारणार पुतळा

मुक्ताईनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे राजकारण करीत त्यांना विरोध करण्याचे व लोकांची दिशाभूल करण्याचे काम काही राजकारणांकडून सुरू आहे. परंतु ती जागा अधिकृत आहे. शासकीय परवानगी घेऊनच शिवरायांचा ५० फुट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती आ.चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here