सोमेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

0
33

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

शहरातील जळगाव रस्त्यालगतच्या सोनबर्डीच्या टेकडीवरील सोमेश्वर महादेवाराच्या मंदिरात श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमी असल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी होती. मंदिरात मंत्री गिरीश महाजन, नगराध्यक्षा साधना महाजन यांच्याहस्ते आरती करण्यात आली.

श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि नागपंचमी असल्यामुळे भाविकांसाठी योग ठरला. त्यामुळे जामनेर शहरातील सोमेश्वर महादेव मंदिरावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी महादेव मंदिरात दर्शन घेऊन आरती केली. यावेळी राज्यातील जनता सुखी समृद्धी होवो, चांगल्या प्रकारे पाऊस पडो, अशी प्रार्थना केली. त्याचबरोबर येणाऱ्या काळात जामनेर शहराची शोभा वाढविणारी सोनबर्डी व सोमेश्वर महादेव मंदिर परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांना याठिकाणी दर्शन व पर्यटनाचा लाभ मिळणार असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here