वेळोदेतील भोई समाजाच्या कुटुंबाला दिला मदतीचा हात

0
31

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

तालुक्यातील वेळोदे येथील भोई समाजाचे कुटुंबातील स्व.अमोल भाऊ यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेऊन परिस्थिची विचारणा केली. त्याच्या आईवडिलांना आर्थिक मदतीचा आधार म्हणून दूध संघाचे संचालक, भाजप नेते रोहीत निकम यांनी एक लाख रूपये मदतीचा हात दिला.

भोई समाजाच्या कुटुंबातील कर्ता, करविता शालेय विद्यार्थी वन विभागाची परीक्षा हॉल तिकिट घेण्यासाठी जात असतांना काळाने झडप घातली. त्यात अमोल हे आपल्यातून कायमचे निघुन गेले. त्यामुळे स्व.अमोल यांचे सांत्वन करण्यासाठी दूध संघाचे संचालक रोहीत निकम, भाजपाचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, चोपडा विधानसभा निवडणूक प्रमुख गोविंद सैंदाणे, जैन प्रकोष्टचे तालुकाध्यक्ष संजय जैन, चिटणीस भरत सोनगिरे, चंद्रशेखर पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here