चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
साईमत/चोपडा/प्रतिनिधी
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी अधिक तपास करीत अचानक एकाच्या घरी धाड टाकल्यावर २४ ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मोहम्मद कादिश शेख आयुब (वय ३८, रा.केजीएन कॉलनी, नायरा पेट्रोल पंपच्या मागील गल्ली) राहत असलेल्या घरात घराच्या बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये प्रतिबंध असलेल्या पान मसाला व सुगंधित तंबाखू, जर्दा एक लाख ८७ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तो पहाटेच विक्री करतांना आढळून आल्याने चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी त्याला ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, महेश्वर रेड्डी यांनी नाकाबंदी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्याप्रमाणे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, मधुकर साळवे, त्यांच्या सोबत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे कारवाई केली आहे. अधिकचा तपास पोलीस करीत आहे.