साईमत, शेंदुर्णी, ता.जामनेर : वार्ताहर
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शेंदुर्णी मराठा कुणबी पाटील समाजसेवा मंडळाच्यावतीने रविवारी, ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मूक मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाचे नेतृत्व समाजाचे ज्येष्ठ नेते दगडू पाटील, संजय गरूड, उत्तम थोरात, डॉ.सागर गरूड, प्रफुल्ल पाटील, सीताराम पाटील, भागवत पाटील, सुनील गरूड यांनी केले. मोर्चात जैन समाजाच्यावतीने सागरमल जैन, बारी समाजाच्यावतीने सुधाकर बारी, गुजर समाजाच्यावतीने शांताराम गुजर तर तेली समाजाच्यावतीने राजेंद्र पवार यांनी उपस्थित राहून मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला.
मोर्चाला पहुर दर्जापासून सुरुवात होऊन युनियन बँक, दत्त मंदिर चौक, गांधी चौक, महावीर मार्ग, बस स्थानक मार्गे शेंदुर्णी पोलीस दुरक्षेत्रावर मोर्चा नेण्यात आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी संजय गरूड, उत्तम थोरात, डॉ.सागर गरूड, समाज मंडळाचे अध्यक्ष विलास अहिरे, उपाध्यक्ष निलेश थोरात यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे समाज बांधवांवर केलेल्या लाठीमाराचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात विविध मागण्यांचा समावेश
निवेदनातून जालना जिल्ह्यातील लाठीमार घटनेची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामा घ्यावा, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. तसेच मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या त्वरित मार्गी लावाव्यात, अश्या मागण्या केल्या आहेत. मराठा समाज बांधवांच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी मोर्चेकऱ्यांना दिले. मोर्चासाठी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील, संजय बनसोड, ए.एस.आय. शशिकांत पाटील, हेड कॉन्स्टेबल विरणारे, श्री.पाटील, श्री.बडगुजर, गायकवाड यांच्यासह अन्य पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यांनी नोंदविला सहभाग
मोर्चात स्नेहदीप गरूड, सुरेश बगळे, मंगल बिल्होरे, संजय गोतमारे, संजय चिंचोले, अतुल पाटील, तुकाराम पाटील, भगवान बाविस्कर, राजेंद्र पाटील, विठ्ठल गरूड, शंकर गरूड, राहुल पाटील, सागर पाटील, सिद्धेश्वर पाटील, मनोज चव्हाण, प्रवीण गरूड, शंतनु गरूड, धनंजय गरूड, प्रवीण पाटील, गणेश सोनवणे, सुनील काळे, अक्षय पाटील, भैय्या सुर्वे, स्वप्नील पाटील यांच्यासह समाजातील सर्व युवकांनी सहभाग नोंदविला होता.