साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचन योजना व सोयगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सिल्लोड – सोयगाव मतदारसंघाच्या विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भरघोस निधी मंजूर करून दिला. मुख्यमंत्री होताच त्यांनी विधिज्ञांची फौज उभी करून ओबीसी समाजाला न्याय मिळवून दिला. त्यामुळे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सिल्लोड येथे 31 जुलै रविवार रोजी भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला असून या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी तालुक्यातील प्रत्येक गावातून हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथे केले.
सिल्लोड येथे होणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार व विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त सोयगाव येथे आयोजित पूर्वतयारी बाबत आढावा बैठकीत आमदार अब्दुल सत्तार बोलत होते.
येत्या रविवार ( दि.31 ) रोजी सिल्लोड शहरातील नगर परिषद प्रशालेच्या प्रांगणात दुपारी 1 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सोयगावला वेळ देताच आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने आयोजनाची जैयंत तयारीला सुरुवात केली आहे. पावसाचे दिवस असल्याने नगर परिषद प्रशालेच्या प्रांगणात वॉटरप्रुप मंडपाची व्यवस्था करण्यात येणार आहे. आज आमदार अब्दुल सत्तार व पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद प्रशालेच्या प्रांगणात पाहणी करून तयारीला सुरुवात केली. यावेळी व्यासपीठ ,महिला व पुरुषांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आदी जागा निश्चित करण्यात आल्या असून त्याअनुषंगाने कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
बैठकीस शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकरराव काळे, जि.प.सदस्य गोपीचंद जाधव,माजी प. स. सभापती धरमसिंग चव्हाण, नितीन बोरसे,सोयगाव नगरपंचायतचे अक्षय काळे, हर्षल काळे, संतोष बोडखे,संदीप सुरळकर, भगवान जोहरे, गजानन कुडके, लतिफ शहा, अशोक खेडकर इ. नगरसेवक तसेच शेख रउफ, राजेंद्र घनघाव, किशोर मापारी, राजू दुतोंडे, विष्णू इंगळे, कदीर शहा, दिलीप देसाई, मोतीराम पंडित,रमेश गव्हांडे,विक्रम चौधरी,भगवान वारंगणे,योगेश नागपुरे,दारासिंग चव्हाण,बाबू ठेकेदार, शिवाप्पा चोपडे,सांडू तडवी,श्रीराम चौधरी.राधेश्याम जाधव, सलीमखा पठाण, दत्तू इंगळे, शफिकखा पठाण, उस्मानखा पठाण,विजू भाऊ तायडे, रविंद्र बावस्कर, विलास वराडे, भीमराव बोराडे, राजू बलांडे, फिरोजखा पठाण, महंम्मा देशमुख,राजमल पवार, राजू रेकनोद,हिरा चव्हाण, सुरेश चव्हाण, श्रावण जाधव, श्रावण राठोड, यशवंत जाधव, मखराम राठोड,सांडू मानसिंग राठोड, शमा तडवी, समाधान तायडे, कुणाल राजपूत, शिवाजी राजपूत, दादाभाऊ जाधव, संजय आगे,जीवन पाटील, भारत तायडे, पंजाब कुनघर, हर्षल देशमुख,वसंत राठोड,उमरखा पठाण,साहेबराव सपकाळ, विलास राठोड,सिताराम जाधव, गणेश खैरे,ज्ञानेश्वर वारंगणे,कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.