महाकाय ट्रालाने महामार्गाला लावली मोगरी; तब्बल 5 ते 6 तास वाहतुकीचा खोळंबा

0
18

साईमत नशिराबाद प्रतिनिधी

महामार्ग क्र. 6 वर बिजपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या तब्बल 216 टायरच्या महाकाय ालाने जलद गती महामार्गाला अक्षरश:  5 ते 6 तास मोगरी लावली होती. दरम्यान रात्री 9 वाजेच्या सुमारास महामार्ग पोलिसांसह नशिराबाद पोलिस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमाने वाहतूक सुरळीत केली.

महामार्ग क्रं. 6 हा चौपदरी झाल्याने या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात भली मोठी असणारी अवजड वाहने ये-जा करीत आहेत. मुंबईहून नागपूरकडे जाणारा सोयीचा मार्ग म्हणून या महामार्गाकडे वाहतूक चालक पहात असतात. आज दुपारच्या सुमारास बिसपूरहून मुंबईकडे जाणारा इलेक्ीक टर्बाईन या महाकाय ाला भुसावळहून जळगावकडे जात असतांना टोल नाक्यानजीक रेल्वे उड्डाण पुलाजवळ वळणाच्या रस्त्यावर खोळंबला. हा ाला तब्बल 125 फूट लांबीचा असल्याने महामार्गावरील वाहतूक कोंडी होत अक्षरक्ष: महामार्ग थांबला होता. हा महाकाय ाला तब्बल 216 टायरांवर धावत असून यास नियंत्रणासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या ालाच्या पुढे व मागे दोन अत्याधुनिक साहित्यांनी सुसज्ज असलेल्या वाहनांचा समावेश आहे.

दरम्यान, ओरिएन्ट सिमेंट कंपनीसमोर हा ाला अडकल्याने अनेक दुचाकी स्वारांनी अक्षरश: ालाच्या खालून निघत मार्ग काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वाहतूक कोंडी झाल्याने चौपदरी महामार्ग व्यवस्थापन, महामार्ग वाहतूक नियंत्रण पोलिस यांच्यासह नशिराबाद पोलिस स्थानकाचे सपोनि अनिल मोरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचत वाहतूक सुरळीत करण्यासाठी या महाकाय ाल्यास टोलनाक्यावर बाजूला सारण्याचे काम युध्दपातळीवर केले. साधारणत: दुपारच्या सुमारास अडकलेला हा ाला रात्री 9 वाजेच्या सुमारापर्यंत  बाजूला करण्यात आला व वाहतूक सुरळीत करण्यास प्रशासनाला यश आले. दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने घटनास्थळी भुसावळ विभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी घटनास्थळी थांबून परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तळ ठोकले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here