साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर शाखेची सहविचार सभा नुकतीच उत्साहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे होते. हिंदी दिनानिमित्त येत्या १४ सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्याबाबत सर्वानुमते ठरविण्यात आले.
पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी ग्रामीण व शहरी असे दोन गट ग्रामीण व शहरी केले आहेत. यावर्षी विविध कार्यक्रम घेण्याबाबत विचार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्याध्यापक म्हणून हिंदी अध्यापक मंडळाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य एन.आर.चौधरी यांची वर्णी लागल्यामुळे मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. हिंदी अध्यापक मंडळाच्या कार्याचा लेखाजोखा मंडळाचे सचिव दिलीप पाटील यांनी मांडला. आगामी काळामध्ये राबवायचे उपक्रम याबाबत सविस्तर चर्चा मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केली. सर्व कार्यक्रमांना मंडळाच्या सर्व सदस्यांनी संमती दर्शविली.
यांची होती उपस्थिती
यावेळी मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ईनशुलकर, खजिनदार राजेंद्र पाटील, सचिव दिलीप पाटील, जिल्हा प्रतिनिधी एन.आर.चौधरी, मार्गदर्शक सोपान भवरे, सदस्य कमलाकर संदानशिव, प्रदीप चौधरी, मुनाफ तडवी, योगेश्वरी पाटील, कविता मनोरे, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव दिलीप पाटील तर ज्ञानेश्वर ईनशुलकर यांनी आभार मानले.



