New Bus Stand In Jalgaon : जळगावातील नवीन बसस्थानकात आरोग्यसेविकेच्या सोनपोतवर चोरट्यांचा डल्ला

0
10

जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील नवीन बसस्थानकातून सुटी असल्यामुळे जामनेर येथील मूळगावी जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना आरोग्य सेविकेच्या ७० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या पोतवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ज्योती प्रमोद वाघ (वय ४७, रा. खोटे नगर, मूळ रा. जामनेर) असे त्या महिला आरोग्य सेविकेचे नाव आहे.

जळगाव जिल्हा परिषदेत ज्योती वाघ ह्या आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. २१ जून रोजी त्या सुटीनिमित्त आपल्या मूळगावी जामनेरला जाण्यासाठी नवीन बसस्थानकातून बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १३.२० ग्रॅम वजनाची आणि अंदाजे ७० हजार रुपये किमतीची सोनपोत लांबविली आहे. ही घटना बसमध्ये चढत असतानाच घडल्याचे सांगण्यात येत आहे.

जामनेरला घरी पोहचल्यावर चोरी झाल्याचे आले निदर्शनास

जामनेर येथील घरी ज्योती वाघ ह्या पोहचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, आपल्या गळ्यातील सोनपोत चोरीला गेली आहे. या प्रकाराने त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोत चोरी प्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here