पाठलाग करत विदेशी मद्याचा कंटेनर पकडला

0
15

साईमत, नाशिक । प्रतिनिधी

गोवा राज्यात निर्मिती केलेले विदेशी मद्याचा साठा अवैधरित्या वाहतूक करून नेणाऱ्या कंटेनरला पाठलाग करून विंचूर चौफुली येथे पकडण्यात आला. कंटेनरमध्ये विदेशी मद्याचे ११०० बॉक्स आढळून आले असून, कंटेनरसह विदेशी मद्य असा एक कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) येवला पथकाने कामगिरी केली आहे. कैलास पांडु लष्कर (३३, रा. शासकीय दूध डेअरी रोड, चक्कर बर्डी, धुळे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

एक्साईजच्या भरारी पथकाला गोवा राज्यातील विदेशी मद्याची अवैधरित्या कंटेनरमधून वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने नाशिक-संभाजीनगर (औरंगाबाद) रोडवरील निफाड, विंचूर येथे सापळा रचला होता. एक्साईजच्या पथकाकडून संशयित कंटेनरचा शोध घेतला जात होता. त्याव्ोळी विंचूर चौफुली येथे संशयित कंटेनर (क्र.एमएच ४८ सीबी ४७७३) निदर्शनास आला. पथकाने कंटेनरची नाकाबंदी केल्यानंतरही संशयित चालकाने कंटेनर पळविण्याचा प्रयत्न केला. त्याव्ोळी पथकाने पाठलाग करून कंटेनरला विंचूर चौफुलीवरील पवन स्वीटमार्ट येथे अडविले. कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये व्हिस्कीचे ५२ हजार ८०० रुपयांचे ११०० बॉक्स आढळून आले. हे मद्य महाराष्ट्रात विक्रीस बंदी आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून संशयिताला अटक करण्यात आली. विदेशी मद्य, कंटेनर, मोबाईल, प्लॅस्टिकच्या बाटल्या असा १ कोटी ९ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.

ही कामगिरी एक्साईजचे उपायुक्त डॉ. बा. ह. तडवी, अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला विभागाचे निरीक्षक विठ्ठल चौरे, संजय वाकचौरे, प्रवीण मंडलिक, अवधुत पाटील, संतोष मुंढे, विठ्ठल हाके, अमन तडवी, मुकेश निंबेकर यांनी बजावली. तपास संजय वाक्‌‍चौरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here