पहूरला बसस्थानक परिसरातील चहाच्या टपरीला आग

0
30

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील पहुर बसस्थानक परिसरातील कृषी पंडीत मोहनलाल लोढा कॉम्पलेक्समधील पितांबर कलाल यांच्या ‘जय सप्तशृंगी माँ टी सेंटर’ नावाच्या चहाच्या दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, त्यात दुकानातील सर्व फर्निचर, फ्रीज, चहाचे साहित्य, इतर किरकोळ किराण्याचा माल व रोख रक्कम पूर्णतः जळून खाक झाले आहे. त्यामुळे अंदाजे १० ते १२ लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचे दुकान मालक अनिल कलाल यांनी सांगितले. रात्री अग्निशमन दलाच्या गाडीच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड, माजी सरपंच प्रदीप लोढा, माजी उपसरपंच शाम सावळे यांच्यासह इतर नागरिकांच्या सहाय्याने ही आग विझविण्यासाठी प्रयतन केले. याठिकाणी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस भरत लिंगायत, रवींद्र देशमुख यांनी पाहणी करून पंचनामा केला. तपास पहूर पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here