Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»खर्डी शिवारात वीज कोसळून शेतमजूर जागीच ठार
    चोपडा

    खर्डी शिवारात वीज कोसळून शेतमजूर जागीच ठार

    saimatBy saimatOctober 15, 2024Updated:October 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    खर्डी शिवारात वीज कोसळून शेतमजूर जागीच ठार-www.saimatlive.com
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खर्डी शिवारात वीज कोसळून शेतमजूर जागीच ठार

    साईमत/चोपडा/विशेष प्रतिनिधी

    तालुक्यातील अडावद येथून जवळील लोणी येथील ३५ वर्षीय शेतमजूर खर्डी शिवारातील एका शेतात केळी लागवड करत असताना मंगळवारी, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास वीज कोसळून जागीच ठार झाल्याची घटना घडली. दरम्यान, घरातील कर्ता पुरुष नैसर्गिक आपत्तीने ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

    सविस्तर असे की, अडावद येथून जवळील लोणी येथील शिवाजी चैत्राम कोळी (वय ३५) हा मंगळवारी खर्डी शेत शिवारातील इच्छापूर शिवारातील शेतात केळी खोडाची लागवड करण्यासाठी गेलेला होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक वादळ वाऱ्यासह विजेचा गडगडाट सुरू झाला. त्यात शिवाजी कोळी यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते जागीच ठार झाले.

    त्यांना अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यावर तेथून चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला.उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाटील यांनी मृताची उत्तरीय तपासणी करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. रात्री दहा वाजता शोकाकुल वातावरणात शिवाजी कोळी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    chop : माहेरी आलेल्या महिलेची विहिरीत उडी दोन मुलांसह मृत्यू

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.