साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पाटणा येथील चंडिका मंदिराच्या परिसरात ऋषीपंचमीनिमित्त महिला भाविकांनी गर्दी करून पूजा केली. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांसह वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
तालुक्यातील पाटणा येथील चंडिका मंदिराच्या परिसरात ऋषीपंचमीनिमित्त महिलांनी हजेरी लावत पूजन केले. दरवर्षीप्रमाणे यंदाची गर्दीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महिलांना सुरळीत दर्शन घडवून आणले. यामुळे वन्यजीव विभागासह पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेचे सर्व ठिकाणाहून कौतुक करण्यात येत आहे.
यशस्वीतेसाठी सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, स.पो.नि. तुषार देवरे, डी.के. जाधव वनपाल (प्रभारी- वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) चाळीसगाव), ऋत्विक तडवी (वनरक्षक पाटणा), अशोक मोरे (विशेष वनरक्षक पाटणा), उमेश सोनवणे (मुख्य गेट पाटणा वनरक्षक) तसेच सर्व रोजंदारीवरील वनमजुर आदींनी परिश्रम घेतले.
