कापड व्यापाऱ्याला मारहाण करत लूट

0
16

भुसावळ : प्रतिनिधी

नागपूर येथील कापड व्यापाऱ्याला शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल तनारीकाजवळ अज्ञात तिघांनी कट मारल्याचे निमित्त करीत बेदम मारहाण केली. व्यापाऱ्याकडील ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना मंगळवारी, १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजता घडली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात तक्रार केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तीन जणांना अटक केली आहे. संशयिताना न्यायालयात हजर केल्यावर मंगळवारी, २२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हर्षल संजयकुमार सावकारे (वय २७, रा.पांडुरंग टॉकीजवळ, भुसावळ), आनंद प्रकाश पवार (वय २०, रा.नागसेन कॉलनी, कंडारी, ता.भुसावळ) आणि अनिकेत सदानंद सोनवणे (वय २३, रा. सराफ बाजार, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सविस्तर असे की, किशोर रामेश्वर सदावर्ते (वय ३१ रा. नागपूर) हे कापड व्यापारी आहे. ते मित्रासह कारने सुरत येथे कपडे खरेदीसाठी गेले होते. परतीच्या प्रवासात कारने दोघे नागपूरकडे निघाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील हॉटेल तनारीकासमोरील उड्डाण पुलावर व्यापाऱ्यांच्या चारचाकीला त्रिकूटाने मोपेडद्वारे कट मारला. वाहन अडवत दोघांना मारहाण करीत केली. तसेच व्यापाऱ्याच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची व ३० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन व ४ हजार रुपये किंमतीचे व २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट व ५०० रुपये किंमतीची कापडी बॅग (ज्यात एटीएम, आधारकार्ड, लायसन्स होते) संशयितांनी हिसकावून पोबारा केला होता.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, गुन्हे शोध पथकातील निलेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, तेजस पारीस्कर, पो.हे.कॉ. प्रशांत परदेशी, योगेश माळी, सचिन चौधरी, जावेद शहा यांनी केली. तपास सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे, सुदर्शन लाड करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here