मयत वारसाच्या पत्नीला चार लाखाचा धनादेश प्रदान

0
12

साईमत/ न्यूज नेटवर्क । मलकापूर ।

गेल्या २६ मे २०२४ रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे समर्पण लोन येथे अंगावर भिंत पडल्यामुळे मंगल गेट मारुती मंदिराजवळ मलकापूर येथील विशाल प्रल्हाद चोपडे मरण पावल्यामुळे नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तहसीलदारांकडून चार लाख रुपये मयत व्यक्तीच्या वारसाला त्यांच्या पत्नी शिला विशाल चोपडे (रा.मंगल गेट, मारुती मंदिराजवळ, मलकापूर, जि.बुलढाणा) यांना २६ जून रोजी तहसील कार्यालयात धनादेश प्रदान करण्यात आला.

यावेळी नायब तहसीलदार एस.एस.उगले, देवेंद्र कुऱ्हे, नायक नाझर जी.यु.खुळे, तलाठी धीरज जाधव, ओम शांती समितीचे सचिन भंसाली, हनुमान सेनेचे अमोल टप, वीरेंद्र कासे, प्रहार संघटनेचे अजय टप, शालिग्राम पाटील, दिलीप पाटील, बळीराम बावस्कर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here