Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»सोयगाव»नांदातांडाला वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला चार लाखांचा धनादेश
    सोयगाव

    नांदातांडाला वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला चार लाखांचा धनादेश

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते धनादेश सुपूर्द

    साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :

    तालुक्यातील नांदा येथे वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या तुकाराम मोहन चव्हाण यांच्या वारस ललीताबाई तुकाराम चव्हाण यांना चार लाख रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच सुपूर्द करण्यात आला.

    नांदा तांडा येथील शेतकरी तुकाराम मोहन चव्हाण हे घरी पोळा सण करून शेतात गेले होते. शेतातून रात्री ८ वाजेच्या सुमारास ते परत घरी येताना पाऊस सुरू झाल्याने ते वाटेतील एक झाडाखाली थांबले. यावेळी झाडावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीने घटनेचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, या घटनेनंतर अब्दुल सत्तार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला होता. राज्य शासन आपल्या पाठीशी आहे अशा शब्दांत त्यांनी धीर दिला होता. मयताच्या वारसाला शासनाची मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली होती. त्याअनुषंगाने त्यांनी पाठपुरावा करीत मयत तुकाराम चव्हाण यांच्या वारसाला चार लाखांचा शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

    यांची होती उपस्थिती

    यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, सोयगावच्या तहसीलदार मनीषा मेने, नायब तहसीलदार सतीष भदाणे, कृउबा समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण, संचालक नंदकिशोर सहारे, माजी सभापती धरमसिंग चव्हाण, नांदातांडा येथील पृथ्वीराज चव्हाण, दारासिंग चव्हाण, युवराज चव्हाण आदींची उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Soygaon : १३ वर्षांनंतर घोसला आरोग्य उपकेंद्र पुन्हा कार्यान्वित

    December 15, 2025

    flood ; पुरात रस्ताच गेला वाहून

    October 3, 2025

    Water bodies dry : वेताळवाडी, धिंगापूर,घोसला शिवारातील पाणवठे कोरडेठाक; वन्यप्राणी मृत्यूच्या दाढेत

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.