चाळीसगावला एकावर चॉपरने हल्ला हुडको कॉलनी परिसरात गुन्हा दाखल

0
35
चाळीसगावला एकावर चॉपरने हल्ला हुडको कॉलनी परिसरात गुन्हा दाखल-www.saimatlive.com

साईमत चाळीसगाव प्रतिनिधी

‘चाळीसगाव पोलिसात केस करतो का’, अशी विचारणा करत दोघांनी मोटारसायकल अडवून शाबीर जाबीर शाह उर्फ सोनू शाह यांच्यावर चॉपरने हल्ला केला. तसेच बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी तिरंगा पुलावर घडली होती. याप्रकरणी हुडको कॉलनी परिसरात गुन्हा दाखल केला आहे.

शाबीर शाह हे दुचाकीने जात असताना हुडको कॉलनीतील अहमद इस्माईल पठाण आणि त्याचा भाऊ फिरोज इस्माईल पठाण याने तिरंगा पुलावर त्यांना अडविले. शाह हे हिरापूर रोडकडे जात होते. अहमद पठाण याने चॉपरने शाह यांच्या डाव्या बाजूच्या पंजावर आणि पायाच्या पंजावर मारहाण केली. ‘तू आमच्याविरुद्ध केस करतो का’, असे म्हणून शिवीगाळ केली. ‘तुला आम्ही जिवंत सोडणार नाही’, अशी धमकीही दिली. या दोघांच्या तावडीतून शाह यांनी सुटका करून थेट पोलीस ठाणे गाठले. शाह यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here