बनावट नोटा प्रकरणी ‘त्या’ दोघांवर गुन्हा दाखल

0
22

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील पिंप्री येथे बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता दोन जणांना ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण नंदलाल जैस्वाल (मध्य प्रदेश) आणि राधेशाम शरद जाखेटे (रा. वडगाव बु., ता. चोपडा, ह.मु.फॉरेस्ट कॉलनी, जळगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे.

सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे दोन तरुणांनी बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता वेगवेगळ्या दुकानांवर जाऊन त्यांच्याकडील ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला. त्यात भाजीपाला विक्रेते विजय प्रकार बडगुजर (वय ४३, रा. पिंप्री, ता. धरणगाव) यांना ५०० ची नोट बनावट असल्याचे लागलीच लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तातडीने धरणगाव पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी संशयित आरोपी प्रवीण जैस्वाल आणि राधेशाम जाखेटे यांना अटक केली. त्यांच्याकडून बनावट ५०० रूपयांच्या २७ नोटा हस्तगत केल्या आहे. भाजीपाला विक्रेत विजय बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुरूवारी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील करीत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here