>> बीएचआर प्रकरणी खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकरण भोवले
साईमत/पुणे/प्रतिनिधी :
पुणे पोलीस दलातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गृहविभागाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल केला आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) जळगाव या पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांनी २०२१ मध्ये तीन गुन्हे नोंदवले. त्यावेळी पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके कार्यरत होत्या. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. गृहविभागाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात रात्री अंत्यत गुप्तता पाळत हा गुन्हा नोंदवला गेला. यावरून मात्र पुणे पोलिसांसह राज्य पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
गुन्ह्यांच्या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा ठपका
आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के या पुण्यात आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्त होत्या. त्यावेळी बीएचआर पतसंस्थेवर कारवाई केलेली होती. याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.