Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»Bhusawal:गजबजलेल्या बसस्थानक परिसरात धावत्या कारने घेतला अचानक पेट
    भुसावळ

    Bhusawal:गजबजलेल्या बसस्थानक परिसरात धावत्या कारने घेतला अचानक पेट

    saimatBy saimatJanuary 4, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Bhusawal: A car suddenly caught fire in a busy bus stand area.
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चालकाचे प्रसंगावधान, मोठा अनर्थ टळला

    साईमत /भुसावळ/प्रतिनिधी

    भुसावळ शहरातील अत्यंत वर्दळीच्या आणि गजबजलेल्या बसस्थानक परिसरात रविवारी ४ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एक थरारक घटना घडली. भररस्त्यावरून जात असलेल्या एका कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवत गाडी थांबवून बाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला असून चालक थोडक्यात बचावला आहे.

    प्राप्त माहितीनुसार, भुसावळ येथील रहिवासी विकी साबने हे रविवारी दुपारी आपल्या एमएच १९ सीएफ ३७७८ क्रमांकाच्या कारने प्रवास करत होते. त्यांनी घराकडे निघण्यापूर्वी जवळच्या एका पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरले होते. त्यानंतर काही वेळातच कार बसस्थानक परिसरात आली असता, अचानक कारच्या इंजिनमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघू लागला. ही बाब चालकाच्या त्वरित लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि तत्काळ बाहेर पडले.

    चालक गाडीतून बाहेर पडताच काही क्षणांतच कारने भीषण पेट घेतला. भररस्त्यावर जळती कार पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी आपली वाहने थांबवली, तर काहींनी सुरक्षित अंतर राखत घटनास्थळापासून दूर जाणे पसंत केले. या घटनेमुळे काही काळ परिसरात मोठी पळापळ झाली.

    घटनेची माहिती मिळताच भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्पर कारवाईमुळे आग आजूबाजूच्या वाहनांपर्यंत किंवा इतर ठिकाणी पसरली नाही.

    या आगीत संबंधित कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली असावी, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, भरवस्तीत आणि ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

    या घटनेमुळे वाहनचालकांनी वाहनांच्या देखभालीकडे अधिक लक्ष देणे तसेच कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तत्काळ वाहन थांबवून खबरदारी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Bhusawal : भुसावळ आंबेडकर नगरात जुन्या वादातून तरूणावर मारहाण

    March 4, 2026

    Bhusawal : दुचाकी पार्किंगच्या वादातून व्यापाऱ्यावर जमावाची बेदम मारहाण

    March 4, 2026

    Faizpur : अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.