१० हजाराची लाच सहकार अधिकारीला भोवली ; जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई!!

0
16

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

दुसखेडा ता.यावल येथील तकारदार यांना सावकारी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल होवू द्यायचा नसेल तसेच तक्रारदाराविरुद्ध नाशिक येथे जे अपील करणार आहेत सदर अपीलात योग्य ती मदत करण्यासाठी व दाव्याच्या निकालाच्या सत्यप्रती लगेच देण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष 20,000/-रु.लाचेची मागणी करून सदर मागणी केलेली लाच रक्कम पैकी 10,000/-लाच रक्कम स्वतः पंचासमक्ष शशिकांत नारायण साळवे, वय-54, सहाय्यक सहकार अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय, जळगाव वर्ग-3 रा.मंगलमुर्ती नगर, पिंप्राळा, साईबाबा मंदीरा जवळ, जळगाव यांनी स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांनी सन 2013 मध्ये दुसखेडा ता.यावल येथील गट क्रं.१६५ मधील ९७ आर इतकी टायटल क्लिअर शेत जमीन विहीत खरेदीखत करून विकत घेतली होती. नंतर सन २०१४ मध्ये सदर शेतजमीनीचे पुर्वश्रमीचे मूळ मालक निलेश पाटील यांनी सदर शेतजमीन परत मिळण्यासाठी भुसावळ येथील न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला असून सदरचा दावा न्यायप्रविष्ठ आहे. सन -2018 मध्ये निलेश पाटील यांनी पुन्हा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जळगाव यांच्या कार्यालयातदेखील सदर शेत जमीन परत मिळण्यासाठीचा दावा दाखल केला. सदर दाव्याच्या प्रत्येक सुनावणीसाठी तक्रारदार हे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव कार्यालयात हजर राहीले. नंतर सदर दाव्याचा निकाल हा लागला होता म्हणून संबंधीत आलोसे शशिकांत साळवे यांना कार्यालयात जावून भेटून त्यांचे कडून सदर निकालाची प्रत प्राप्त करून घेतली. सदर निकालाच्या अंतिम आदेशात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम सन 2014 चे कलम अन्वये आदेश असे नमूद असून त्याची प्रत पोलीस अधीक्षक जळगाव यांना देण्यात आली व तक्रारदार यांना दाव्याच्या निकालाप्रमाणे त्यांचे स्वतःवर सावकारी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल होवु शकतो तसेच सदरची शेत जमीन परत करण्याचे आदेशीत केले होते. म्हणून तक्रारदार यांनी त्याविरुद्ध अपील करण्याचे ठरवून त्यासाठी लागणारे सदर निकालाच्या सत्यप्रती घेण्यासाठीचा लेखी अर्ज संबंधीत आलोसे यांचेकडे दिला होता.

नंतर तक्रारदार सदर दाव्याच्या निकालाच्या सत्यप्रती घेण्याकरीता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय, जळगाव येथे जावून संबधीत आलोसे यांना भेटले असता आलोसे यांनी तक्रारदार यांना सावकारी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल होवू द्यायचा नसेल तसेच तक्रारदार हे नाशिक येथे जे अपील करणार आहेत सदर अपीलात योग्य ती मदत करण्यासाठी व दाव्याच्या निकालाच्या सत्यप्रती लगेच देण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष 20,000/-रु.लाचेची मागणी करून सदर मागणी केलेली लाच रक्कम पैकी 10,000/-लाच रक्कम स्वतः पंचासमक्ष आलोसे शशिकांत साळवे यांनी स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

सदर कारवाई नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सौ. शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, शशिकांत एस. पाटील, पोलीस उपअधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली व एस.के.बच्छाव, पोलीस निरीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव यांचे नेतृत्वाखाली सफौ. दिनेशसिंग पाटील, पोना.बाळू मराठे, पोकॉ. राकेश दुसाने आदिंच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here