साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जरंडी येथे राष्ट्रीय स्वयंवसेवक संघ व श्री बाळासाहेब संस्थानच्या मार्फत रविवार दि.६ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या वेळी ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी दत्ताजी भाले रक्तपेढी यांच्यावतीने रक्त संकलन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगेश चौधरी,बालाजी संस्थानचे सुधीरनाना कुलकर्णी, सचिन चौधरी,रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील,दिलीप पाटील सुशांत पाटील, लोकेश पाटील, यांच्या इतर जणांनी परिश्रम घेतले यावेळी जरंडी ग्रामपंचायत सरपंच वंदनाताई पाटील,उपसरपंच संजय पाटील, सदस्य मधुकर पाटील ,प्रकाश पवार,बबन चौधरी,दत्ताची भाले रक्तपेढीचे प्रशांत चिटणीस,सौ रेवतीताई, हूमरे ताई आदींनी सहकार्य केले.