आकाशवाणी चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
35

साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव

शहरातील आकाशवाणी चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दि. २५ जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील अक्सा नगर परिसरात शेख रऊफ शेख अब्दुल्ला बेलदार (वय ६९ ) हे आपल्या परिवारासह रहिवासाला आहे. ते ठेकेदारी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. शेख रऊफ हे महाबळकडून दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीडी २७५१) ने जात होते. गजबजलेल्या आकाशवाणी चौकात आल्यावर त्यांना पाळधीकडून भुसावळकडे जाणारा ट्रक क्रमांक (आरजे ११ जीबी ७६४२) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार शेख रऊफ यांचा जागीच मृत्त्यू झाल्याची घटना गुरूवारी २५ जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान , नागरीकांच्या मदतीने शेख रऊफ यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. यावेळी जिल्हापेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून ट्रकसह ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत शेख रऊफ शेख अब्दुल्ला बेलदार यांच्या पश्चात पत्नी,चार मुलं असा परिवार आहे.
दरम्यान, आकाशवाणी चौकात प्रचंड खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे वाहनधारकांची जीव धोक्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here