Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त
    अमळनेर

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    saimatBy saimatFebruary 7, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Amalner: A bigha of cannabis farm destroyed in a crackdown by Amalner police
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मक्याच्या आड गांजाची शेती! गडखांब शिवारात अमळनेर पोलिसांची पहाटे धडक; एक बिघा क्षेत्र उध्वस्त

    साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :

    तालुक्यातील गडखांब शिवारात अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त करण्यात आली असून ओला व सुका गांजा जप्त करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी गडखांब येथील शेतकरी सुरेश लोटन पाटील याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

    पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली होती की गडखांब शिवारातील गट क्रमांक २३२४ मध्ये एका शेतकऱ्याने गांजाची लागवड केली आहे. माहितीची खातरजमा झाल्यानंतर त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांची परवानगी घेतली. कारवाईसाठी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना पंचनामा कामासाठी बोलावण्यात आले.

    त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, शरद काकळीज, नामदेव बोरकर यांच्यासह हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार आणि पोलीस कर्मचारी विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, निलेश मोरे, नितीन मनोरे, सुनील तेली, विनोद सोनवणे, राहुल पाटील, उदय बोरसे, सिद्धांत शिसोदे, गणेश पाटील, संजय सोनवणे, श्यामल पारधी, निलेश पाटील, विनोद पाटील आदींच्या पथकाने दि. ७ रोजी पहाटे सुमारे सहा वाजता छापा टाकला.

    छाप्यात सुरेश लोटन पाटील याच्या शेतात मक्याच्या पिकासोबत गांजाची लागवड केल्याचे उघड झाले. सुमारे सहा फूट उंचीची गांजाची झाडे उगवलेली होती. शेतात पाच ते सात गोण्या ओला गांजा बांधून ठेवलेला आढळून आला, तर एका ठिकाणी गांजा वाळवण्यासाठी ठेवण्यात आल्याचेही दिसून आले. चौकशीदरम्यान संबंधित शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी गांजा विकल्याची कबुली दिल्याचे समजते.

    या कारवाईदरम्यान फॉरेन्सिक पथकाने पंचनामा सुरू केला असून जप्त करण्यात आलेल्या गांजाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. गांजाची लागवड, साठवणूक व विक्रीप्रकरणी संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

    अमळनेर तालुक्यात अशा प्रकारे मक्याच्या आड गांजाची शेती केल्याचे उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अवैध अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी आपली कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.