साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित ए.बी.हायस्कुलच्या २९ विद्यार्थ्यांची एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना ६० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यात ओम सोमनाथ माळी याने ९५ गुण मिळवित यश संपादन केले. ब्राह्मणशेवगे येथील सामाजिक कार्यकर्ते, जल व पर्यावरण प्रेमी, पत्रकार सोमनाथ माळी यांचा ओम चिरंजीव आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक के.एन.तडवी (आ.बं. मुलांचे हायस्कुल), मुख्याध्यापिका सुलोचना इंगळे (आ.बं.मुलींचे हायस्कुल), ज्येष्ठ शिक्षक विजय पाखले, दिलीप शिंदे, निलेश सोमवंशी यांचे मार्गदर्शन केले.
यशाबद्दल सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल, अध्यक्ष आर.सी. पाटील, सचिव डॉ. विनोद कोतकर, आ.बं.मुलांच्या हायस्कुलचे चेअरमन योगेश अग्रवाल, आ.बं.मुलींच्या हायस्कुलचे चेअरमन प्रदीप अहिरराव, मुख्याध्यापक तडवी, मुख्याध्यापिका इंगळे, उपमुख्याध्यापक बाबा सोनवणे, पी.डी.येवले, पर्यवेक्षक कुलकर्णी, सौ.एस. पी.पाटील यांनी कौतुक केले आहे.