Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत
    क्राईम

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    saimatBy saimatFebruary 4, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Chalisgaon: 45-year-old man dies after drowning in Girna river
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

    साईमत/ चाळीसगाव /प्रतिनिधी

    चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदीच्या पात्रात पाण्यात बुडून एका ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ४ फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यशवंत फकिरा निकाळजे (वय ४५, रा. संबोधी, ता. धुळे) असे मयत प्रौढाचे नाव आहे.

    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत निकाळजे हे धुळे जिल्ह्यातील संबोधी गावात कुटुंबासह वास्तव्यास होते. काही कारणास्तव ते चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदी परिसरात आले असताना नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना बाहेर काढले.

    यानंतर यशवंत निकाळजे यांना तातडीने मेहुणबारे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.

    या घटनेमुळे मयताच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गिरणा नदी पात्रात पाण्याची पातळी व प्रवाह लक्षात घेता नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Savda : सावदात भीषण आग! पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे आर्थिक नुकसान

    February 4, 2026

    Erandole : एरंडोल जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला

    February 4, 2026

    Raver : रावेरजवळ समोरासमोर धडक; दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

    February 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.