साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी
तालुक्यातील वरखेडी येथील एका अविवाहित अल्पभूधारक २८ वर्षीय युवकाचा त्यांचेच शेतात पिकाला फवारणी करत असतांना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वरखेडी ता. पाचोरा येथील अविनाश अशोक भोई (वय – २८) यांची वरखेडी शिवारात एक एकर शेत जमिन आहे. अविनाश भोई हे दि. ३० जुलै रोजी आपल्या शेतात लावलेल्या पिकावर फवारणी करत असतांना विषारी औषधाने त्यांना भुरळ येवुन ते बेशुद्ध झाले होते. ग्रामस्थांच्या मदतीने अविनाश भोई यांना तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान मृत्यूशी झुंज देत असतांनाच दि. १ आॅगस्ट रोजी सायंकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अविनाश हा त्यांच्या कुटुंबियातील कर्ता युवक असल्याने त्याचे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत अविनाश भोई यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, तीन बहिणी असा परिवार असुन अविनाश च्या अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.