सर्पदंशाने १० वर्षीय मुलाचा मृत्यू

0
14

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील डांगर बुद्रुक येथे एका १० वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी, २९ रोजी सकाळी १०.३० वाजता घडली. आकाश राजेंद्र भील असे मयत मुलाचे नाव आहे. दरम्यान, आकाशचे काका यांनी शासकीय आरोग्य यंत्रणा सुसज्ज राहिली असती तर पुतण्याला वाचवू शकलो असतो. कारण डांगर बु. हे गाव धुळे रस्त्यावर आहे. अमळनेर किंवा धुळे येथे जाण्यासाठी अंतर आणि वेळ सारखाच लागतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सविस्तर असे की, आकाशचे आई-वडील शेतात मजुरी कामासाठी गेले होते. आकाश राजेंद्र भील हा ४ थीत शिक्षण घेत आहे. तो डांगर बु.येथील जिल्हा परिषद शाळेत जात होता. त्यावेळी त्यास सर्पदंश झाला. त्यावेळेस काकांना माहिती मिळताच त्यास जानवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांनी आकाशला अमळनेर ग्रामिण रुग्णालयात घेऊन जाण्याचे सांगितले. मात्र, त्याठिकाणी व्हेंटिलेटर आणि सर्पदंशचे औषधे नसल्याचे कारण सांगितले. त्यानंतर त्यास धुळे येथील रुग्णालयात नेण्याचे सांगितले. धुळे येथे पोहोचल्यावर तेथील डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here