Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»महिला आयोग राज्यातील २५ हजार गायब मुलींना कधी शोधणार?
    राज्य

    महिला आयोग राज्यातील २५ हजार गायब मुलींना कधी शोधणार?

    saimat teamBy saimat teamJanuary 28, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, वृत्तसंस्था । भारतीय कायद्यानुसार वयात आलेल्या युवक-युवतीने स्वसंमतीने विवाह करणे, हे कायदेशीर आहे; मात्र त्याचा राजकीय दृष्टीने लाभ उठवण्याचा प्रयत्न करणे, हे पूर्णपणे अयोग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रचलित कथेनुसार कल्याणच्या सुभेदाराच्या मुसलमान सुनेचा आदर केला, तिचे धर्मांतर केले नाही; परंतु त्याच वेळी त्यांनी बजाजी निंबाळकर आदी जबरदस्तीने मुसलमान बनवलेल्या हिंदूंना त्यांचे शुद्धीकरण करून पुन्हा हिंदु धर्मात परत घेतले आणि त्यांच्याशी सोयरीक जोडली.

    आज ‘लव्ह जिहाद’चे भयंकर षड्यंत्र चालू असतांना त्यात अडकलेल्या हिंदू युवतींना पुढे जबरदस्ती इस्लाम कबूल करण्यासाठी अत्याचार करण्यात येतात. तसेच अनेकींची हत्याही केल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. उद्या या कुटुंबाला मुले झाल्यास ती ‘हिंदू’ असतील कि ‘मुसलमान’ ?अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देता केवळ प्रसिद्धीसाठी ‘लव जिहाद’ला ‘शिवविवाह’ म्हणणे, हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे, असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.

    पूर्वी समाजवादी चळवळीतले नेतेही त्यांच्या कार्यकर्त्या असणार्‍या हिंदू मुलींचा विवाह मुसलमान युवकांसोबत लावून प्रसिद्धी मिळवत असत; मात्र स्वतःच्या मुलींसाठी कोकणस्थ, देशस्थ असे भेद पाहून मुलगा शोधत असत. या समानतेच्या चळवळीत छायाचित्रे काढून प्रसिद्धी मिळवणार्‍यांनी स्वतःच्या मुलींसाठी असा विवाह ठरवल्यास खरे तर ‘स्वतः केले आणि मग सांगितले’, असा आदर्श घालून देता येईल. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर या अशा विवाहाचे समर्थन करत आहेत, हे दुर्दैवी आहे. एखाद्या आयेशा, रुकसाना हिचा विवाह एखाद्या हिंदू मुलाशी लावून त्या समारंभात चाकणकर यांनी जाऊन उभयतांना आशीर्वाद द्यावेत, मग त्यांची धर्मनिरपेक्षता खरी असल्याचे म्हणता येईल. खरे तर महाराष्ट्रात आज 25 हजार मुली आणि महिला गायब असण्याची धक्कादायक स्थिती असताना महिला आयोगाच्या अध्यक्षा अशा कार्यक्रमात सहभागी होत आहेत, हे दुर्दैवी आहे. तसेच शिवविवाहाच्या नावे धर्मद्रोहाची राजकीय पोळी भाजणाऱ्या ब्रिगेडी प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो, असेही समितीने म्हटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Big Breaking! राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जि.प.–पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू

    January 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.