Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»दिल्लीत धडकलेल्या शेतकरी मोर्चाला मलकापूर येथून जाहीर समर्थन
    राज्य

    दिल्लीत धडकलेल्या शेतकरी मोर्चाला मलकापूर येथून जाहीर समर्थन

    saimat teamBy saimat teamDecember 3, 2020Updated:December 3, 2020No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मलकापूर : प्रतिनिधी

    पंजाब,हरियाणा, दिल्ली व देशातील अन्य प्रांतातुन दिल्लीत केंद्र सरकारच्या ३ काळे कायद्यांविरोधात एकवटलेल्या शेतकरी मोर्चाला जाहीर समर्थन देण्यासाठी काल २ डिसेंबर रोजी मलकापूर, मोताळा व नांदुरा अशा तीन तालुक्यातून शेकडोच्या संख्येत जुने कॉटन मार्केट यार्ड येथे शेतकरी बांधव एकत्रित झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासकीय नियमांचे पालन करीत शेकडो शेतकरी एकवटलेले होते. याठिकाणी प्रमुख शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारने पाशवी बहुमताचे जोरावर संमत केलेल्या ३ काळ्या कायद्यांविषयी थोडक्यात प्रबोधन केले आणि दिल्लीत जमलेल्या मोर्चाला समर्थन देणे आपले नैतिक व राष्ट्रहिताचे कर्तव्य असल्याची भावना व्यक्त केली.
    मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ.अरविंद कोलते, डॉ.साहेबराव मोरे, ऍड. हरीशभाऊ रावळ आणि हाजी रशिदखां जमादार यांची समयोचित भाषणे झाली. त्यादृष्टीने एक लेखी निवेदनच उपविभागीय अधिकारी, मलकापूर यांना यावेळी सादर करण्यात आले.
    या निवेदनावर सर्वश्री ऍड.साहेबराव मोरे,डॉ.अरविंद कोलते, डॉ.हरीश रावळ, दिलीप देशमुख, संतोष रायपुरे, किशोर नवले, अजय टप, रशिदखां जमादार, सनाउल्लाखां जमादार, युसुफ खान, नांदुरा येथील पदमराव पाटील, मोताळा येथून अनिल पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष सोपानराव शेलकर, दत्ताजी हिवाळे, राजूभाऊ पाटील, बंडूभाऊ चौधरी, माधवराव गायकवाड, संभाजीभाऊ शिर्के, मंगलाताई पाटील,  सविताताई जंगले, ज्योतीताई धोरण, सुनंदाताई पवार, शोभाताई मराठे, ऍड.संजय वानखेडे, प्रमोद अवसरमोल, ज्ञानदेव हिवाळे, देवेंद्र पाटील, अशोकराव सुरडकर, ऍड. दिलीपराव बगाडे, प्रल्हाद ढोले, बाळू पाटील, अजित फुंदे, अमोल बावस्कर, शालिग्राम पाटील, शरद मोरे, संतोष मोरे, सुरेश भोजने, ऍड.गारमोडे, सचिन सोमवंशी, विनय काळे, गणेश पाटील, गजानन पाटील, अनंत पाटील, विष्णू तळोले, पराग बर्‍हाटे, रविंद्र पाटील, प्रफुल्ल पाटील, प्रशांत नाफडे, राजेंद्र हिवाळे, ईश्वरसिंह राजपूत, वसंता गव्हाळे, माणिक पाटील, सुरेश पाटील, राजेश चोपडे, निवृत्ती खर्चे, अमोल पाटील, रामचंद्र ढोरे, संतोष निवाने, आकाश ढोलकर, शेषराव पाटील, अरविंद महाजन, उमेश जाधव, निलेश झांबरे, अमोल गावंडे, भीमराव धोरण, राजेंद्र तायडे, संदीप चौरे, अनिल भारंबे, गजानन भारंबे, शरद पाचपांडे, युवराज रायपुरे व समाधान इंगळे सर आदि मान्यवरांच्या सह्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Big Breaking! राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जि.प.–पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू

    January 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.