बर्लिन : वृत्तसंस्था । जर्मनीत खलिस्तान समर्थक 9 आरोपी सक्रिय असल्याचा मोठा खुलासा चौकशीत झालाय. यात शिख फॉर जस्टीसचा जसविंदर सिंग मुलतानीचाही समावेश आहे.त्याच्यावर नुकताच एनआयएने पंजाबमध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्याचा गुन्हा दाखल केलाय. तो अनेक वर्षांपासून जर्मनीतून हे काम करत असल्याचे समोर आलेय. शिख फॉर जस्टीसवर बेकायदेशीर कृत्य नियंत्रण कायद्यानुसार बंदी देखील घालण्यात आली आहे.
भूपिंदर सिंग भिंडा, गुरमीत सिंग बग्गा, बंदी घातलेल्या खलिस्तान जिंदाबाद फोर्स` संघटनेचा शमिंदर सिंग आणि बब्बर खालसा इंटरनॅशनलचा हरजोत सिंग या चौघांविरुद्ध इंटरपोलची रेड नोटीस देखील जारी झालेली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमधील केजेएफचा प्रमुख रणजीत सिंग नीताचा सहकारी भिंडाला डिसेंबर 2012 मध्ये फ्रांकफोर्ट कोर्टाने 4 वर्षे आणि 7 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावली आहे.त्याच्यावर जुलै 2010 मध्ये राधा सौमी बेस डेरा यांच्या हत्येचे षडयंत्र रचल्याचा आरोप होता.
जर्मनीत सक्रिय असणारे ९ खलिस्तान समर्थक कोण?
जसविंदर सिंग मुलतानी (शिख फॉर जस्टीस),भूपिंदर सिंग भिंडा (खलिस्तान जिंदाबाद फोर्स ),गुरमीत सिंग बग्गा (खलिस्तान जिंदाबाद फोर्स ),शमिंदर सिंग (खलिस्तान जिंदाबाद फोर्स ),हरजोत सिंग बब्बर खालसा इंटरनॅशनल. पोलिसांनी केलेल्या चौकशीत बीकेआयचा हरजोत सिंगचा राष्ट्रीय शिख संगतचे नेते रुलदा सिंग यांच्या हत्येतही सहभाग असल्याचं समोर आलंय. रुलदा सिंग यांची 28 जुलै 2009 रोजी पटियालात हत्या झाली होती. याशिवाय हरजोत सिंगचे नाव याचवर्षी पाकिस्तानमधून 14 किलोग्रॅम स्फोटकेतस्करी करण्याच्या प्रकरणातही समोर आले होते.तो 2011 मध्ये फेक नेपाळी व्यक्तीच्या पासपोर्टवर थायलंडला पळून गेला.यानंतर तो पाकिस्तानला पोहचला आणि तिथून त्याने जर्मनी गाठली.
