Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोऱ्यात बोगस  पत्रकारिता करणाऱ्या मुळे शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधीची डोकेदुखी
    पाचोरा

    पाचोऱ्यात बोगस  पत्रकारिता करणाऱ्या मुळे शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधीची डोकेदुखी

    saimat teamBy saimat teamJanuary 19, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा-प्रतिनिधी    पत्रकार, बातमीदार हा सर्वसामान्य जनतेची बाजू मांडणारा, भ्रष्ट राजकारणी आणि अधिकाऱ्यांची पोलखोल करणारा आणि समाजावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा असतो, अशी सामान्य नागरिकांची भावना असते; मात्र काही भानगडबाज मंडळींनी पत्रकारितेची नावाखाली आपल्या तुंबड्या भरण्याचा घाट घातला आहे. सध्या पाचोरा शहरात व ग्रामीण भागात खासगी वाहनांवर प्रेस टिव्ही प्रेस लिहिलेले आणि ऑनलाइन मीडियाच्या नावाखाली कसलीही नोंदणी नसलेले काही स्वयंघोषित बोगस पत्रकार नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये आपली छाप पाडण्यासाठी विविध उद्योग करीत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर प्रेस लिहून आम्ही ऑनलाइन मीडियाचे पत्रकार आहोत, असे प्रेस लिहिलेले ओळखपत्र घेऊन मोठ्या अविर्भावात फिरून नागरिकांसह शासकीय अधिकारी, राजकारणी मंडळी यांना त्रास देत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत.

    दरम्यान, पाचोरा शहरात अशाच अनेक बोगस पत्रकाराने  वाळू वाहतूक करणारेचे ध्वनिचित्रफिती काढीत केलेल्या ५० हजार रुपयांच्या ब्लॅकमेलिंग पैसे वसुली केल्याची जोरदार चर्चा आहे.   अश्या बोगस पत्रकाराने पाचोरा शहरात बेकरी सोमिल हॉटेल रेशन दुकान देशी दारू पान मसाला व्यवसायिक अश्या विविध व्यवसायिकान कडून लाखो रुपये उकळल्याचा चर्चा सुरू आहे.तसेच पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये रोज फेऱ्या मारून विविध स्वरूपात चौकशी करत असतात, पाचोरा शहरात अनेक टोळ्या सक्रिय असून याबाबत पाचोरा पोलिसांनी .अश्या
    बोगस पत्रकाराच्या आयकार्ड तपासून त्याच्या वर फोजदारी पात्र गुन्हा दाखल केला पाहिजे  ज्यांना पत्रकारितेबद्दल “ओ की ठो’ कळत नाही अशा काहींचा या क्षेत्राशी सुतरामही संबंध नाही अशा मंडळींनी पत्रकारितेच्या नावाखाली दुकानदारी सुरू केल्याचे आणि काही तथाकथित संघटनांशी सलगी करण्याचे प्रयत्न चालविल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे.

    दिवाळीच्या काळात तर या बोगस पत्रकारांचा सुळसुळाट खूपच मोठ्या प्रमाणात वाढला होता. ज्याप्रमाणे पावसाळ्यात कुत्र्यांच्या छत्र्या उगवतात, तसेच दिवाळीच्या काळात बोगस पत्रकार पुन्हा एकदा उगवले आहेत. बोगस यू ट्यूब चॅनेलचे पत्रकार हे मोठ्या संख्येने निर्माण झाले आहेत. यू ट्यूब चॅनेलसाठी बातम्या करताना खूप मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यात येत असल्याची चर्चा आहे. यू ट्यूब चॅनेलच्या क्षेत्रात नव्याने आलेले काही पत्रकार प्रलोभनाशिवाय काम करतात अशा मंडळीची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच मर्यादित आहे. याशिवाय संकेतस्थळावर सामाजिक हिताच्या विषयांवर लिखाण करणारे आणि त्याचा सामाजिक हितासाठी प्रसार करणारेही आहेत. मात्र कोणत्याही वृत्तपत्रामध्ये काम न करणारे व केवळ संकेतस्थळांवर ‘लुटीचे अर्थशास्त्र’ राबविणारे बोगस पत्रकारही तयार झाले आहेत. वेगवेगळ्या संकेतस्थळ आणि ब्लॉगवर लिखाण करून सामान्य नागरिक, शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर आपला वचक राहावा म्हणून या बोगस पत्रकारांचा त्रास  मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्या आहेत. अशा मंडळींचा अक्षरशः वैताग आल्याचे काही नागरिक, अधिकारी, राजकारणी सांगत आहेत. अशा मंडळींकडून काही जणांशी संधान साधून एखाद्याची ठरवून बदनामी करण्यासाठी “सुपारीबाज’ पत्रकारिताही उदयास आणली जात असून ती समाजासाठी मारक असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त केली आहे.या बाबत जे पत्रकार वृत्तपत्रासाठी काम करतात त्या वृत्तपत्राच्या पत्रकारांनी आणि पत्रकार संघटनांनी सामाजिक संघटनांनी या बाबत पोलिसात तक्रार दाखल करून कारवाई ची मागणी केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे,

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.