आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाने बाजी मारली.

0
14

फैजपूर: प्रतिनिधी
येथील धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव विभागाच्या  आंतर महाविद्यालयीन भारतोलन, शक्तितोलन आणि शरीर सौष्ठव  स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाने बाजी मारली.        भारतोलन, शक्तितोलन आणि शरीर सौष्ठव स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ अध्यक्षस्थानी जीमखाना समितीचे चेअरमन डॉ. सतिश चौधरी हे उपस्थित होते. उद्घाटन समारंभास प्रा. डॉ. प्रतीभा ढाके, विद्यापीठ क्रीडा मंडळ सदस्य जळगाव विभागाचे सचिव प्रा. डोंगरे, प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा. किशोर वाघ एरंडोल, प्रा. डॉ. मुकेश पवार, प्रा. डॉ सचिन झोपे, प्रा. डॉ. बेलोरकर, प्रा. डॉ. आनंद उपाध्याय, प्रा. सुभाष वानखेडे, प्रा. डॉ. चाँद सर, प्रा. डॉ. महेश पाटील प्रा. उमेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद मारतळे यांनी केले व आभार प्रा. शिवाजी मगर सर यांनी मानले.
आंतर महाविद्यालयीन भारतोलन स्पर्धेसाठी पुरुष गटात तिन संघाने व महिला गटात तिन संघाने सहभाग घेतला, शक्तितोलन स्पर्धेत पुरुष गटात आकडा व महिला गटात चार संघाने सहभाग घेतला तसेच शरीर सौष्ठव स्पर्धेत पुरुष गटात सहा संघाने सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी संपन्न करण्या करिता तांत्रिक समिती सदस्य म्हणून प्रा. डॉ. मुकेश पवार, प्रा. सुभाष वानखेडे व पंच म्हणून  अविनाश महाजन सर,  योगेश महाजन, तुषार सपकाळे, प्रा. विशाखा महाजन, श्री. उमेश कोळी, अल्लाउद्दीन तडवी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद मारतळे यांनी केले व आभार प्रा. शिवाजी मगर सर यांनी मानले.
भारतोलन पुरुष प्रकारात प्रथम- धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, व्दितीय- श्री. व्हि. एस. नाईक महाविद्यालय, रावेर, तृतीय- कला व विज्ञान महाविद्यालय भालोद तर महिला गटात प्रथम क्र.- धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, व्दितीय- श्री. व्हि. एस. नाईक महाविद्यालय, रावेर, व तृतीय क्रमांक. सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालय ऐनपूर.
शक्तितोलन पुरुष प्रकारात प्रथम क्रमांक धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, व्दितीय- श्री. व्हि. एस. नाईक महाविद्यालय, रावेर, व तृतीय क्रमांक शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव आणि महिला प्रकारात प्रथम क्रमांक धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, व्दितीय क्र. श्री व्हि. एस महाविद्यालय रावेर व तृतीय क्रमांक. डॉ. जी. डी. बेडाळे महिला महाविद्यालय जळगाव.
शरीर सौष्ठव क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, व्दितीय क्र. पी. ओ. नाहटा महाविद्यालय भुसावळ तर तृतीय क्रमांक दा. दे. ना. भोळे महाविद्यालय, भुसावळ यांनी प्राप्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्रा. डॉ. सतिश  चौधरी यांनी आजच्या अधुनीक युगातील खेळाचे महत्त्व व भारतोलन आणि शक्तितोलन सारख्या खेळामुळे शरीर व खेळ या साठी कसे उपयोगी आहेत या विषयावर मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.  स्पर्धा यशस्वी संपन्न करण्या करिता तांत्रिक समिती सदस्य म्हणून प्रा. डॉ. मुकेश पवार, प्रा. सुभाष वानखेडे व पंच म्हणून  अविनाश महाजन सर,  योगेश महाजन, तुषार सपकाळे, प्रा. विशाखा महाजन, उमेश कोळी,  अल्लाउद्दीन तडवी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद मारतळे यांनी केले व आभार प्रा. शिवाजी मगर सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here