तिरुवनंतपूरम : वृत्तसंस्था I केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी मॉलला पार्किंग शुल्क आकारण्याचा अधिकार नाहीय असे मत व्यक्त केलेय. न्यायालयाने हे वक्तव्य एर्नाकुलम येथील प्रसिद्ध लुलु इंटरनॅशनल शॉपिंग मॉलकडून मोठ्या प्रमाणात पार्कींग शुल्क घेतले जात असल्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेबद्दल बोलताना केलेय. या प्रकरणामधील पुढील सुनावणी 28 जानेवारी रोजी होणार आहे.
केरळ उच्च न्यायालयाने कलामास्सेरी नगरपालिकेकडूनही यासंदर्भातील माहिती मागवली आहे. लुलु इंटरनॅशनल शॉपिंग मॉलला पार्किंगसाठी पैसे आकारण्याचा काही परवाना देण्यात आलाय का हे महापालिकेने सांगावं, असं न्यायालयाने म्हटलंय. इमारतीच्या बांधकामाच्या वेळी पार्किंग असेल या अटीवरच बांधकामास परवानगी दिली जात असल्याने पार्किंगसाठी पैसे आकारणे चुकीचे आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केलेय.
