Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»भुसावळात घरोघरी जावून वाटप केले संक्रांतीचे वाण
    भुसावळ

    भुसावळात घरोघरी जावून वाटप केले संक्रांतीचे वाण

    saimat teamBy saimat teamJanuary 18, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी
    समाजात विविध प्रकारची बांधीलकी असते. मात्र, ती जोपासतांना वर्तमान स्थितीचे भान राखावे लागते. त्याचवेळी समाजात केलेल्या कार्याचा नक्कीच आदर होतो. असेच सामाजिक बांधीलकी व वर्तमान परिस्थितीचे भान राखत रीती व परंपरा जोपासत लोणारी परिवाराने यंदाही सालाबादाप्रमाणे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मकर संक्रांतीच्या निमित्ताने होणारा कार्यक्रम आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा केला. यंदा त्यांनी प्रभागातील प्रत्येक नागरीकांच्या घरी जात संक्रातीचे वाण व तिळगुळ वाटप करून हा सण साजरा केला.
    देशात कोरोनाचे संकट अद्यापही शमले नाहीत. मात्र सण-वार, चाली-रिती जोपासणे आपले कर्तव्य आहे. शहरातील भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा तथा माजी शिक्षण समिती सभापती मिना लोणारी, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी व परिवारातर्फे दरवर्षी संक्रातीला हळदीकुंकूवाचा मोठा कार्यक्रम होत असतो. सद्यस्थितीत परिस्थितीचे भान ठेवत जाहीर कार्यक्रम रद्द करत लोणारी परिवाराने प्रभागातील प्रत्येक घरोघरी जावून महिलांना संक्रातीचे वाण दिले.
    प्रभाग आठमधील महात्मा फुले नगर, भारतनगर, फकीर वाडा, कुंभारवाडा, काशिराम नगर, वेडीमाता नगर, आराधन कॉलनी, रेलदुनिया परिसर, विद्यानगर, दत्तनगर, खळवाडी, श्रीनगर, अष्टविनायक कॉलनी आदी परिसरातील दोन हजार महिलांना घरपोच वाण व हळदीकुंकू दिले गेले.
    यावेळी मिना लोणारी, श्वेता लोणारी, तृप्ती लोणारी, वत्सला सोनवणे, पुनम सोनवणे, निर्मला तायडे, मनिषा अमोदकर, सुमनबाई चौधरी, तेजस्विनी बोरसे, सिमा पाटील आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे प्रभाग आठमधील महिलावर्गाने स्वागत केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी, छत्रपती ग्रुपचे गौरव लोणारी, वैभव लोणारी, कपिल लोणारी, राजेंद्र आमोदकर, नरेंद्र सोनवणे, संदीप सोनागरे, किरण तायडे, ऍड. प्रशांत भागवत, राध्येशाम नांदुरकर, शुभम सोनवणे, प्रतिक सोनवणे, तुषार तायडे, किरण बेलसकर, भुषण गवळे, अतुल पाटील, विजय सोनवणे, संजय विश्‍वकर्मा, भुषण सपकाळे, अतुल सपकाळे, गणेश लोहार, रमाकांत पाटील, कैलास चौधरी, जीवन गोराडकर, छगन चौधरी, स्वप्निल बोरनारे, ज्ञानेश्‍वर पवार, शुभम चौधरी आदींनी परीश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Bhusawal : साकेगाव येथील नवोदय विद्यालयाच्या सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा

    February 5, 2026

    Bhusawal : १० लाखांची आर्थिक फसवणूक आणि धमक्या

    February 4, 2026

    Bhusawal : संतोषी माता सभागृहाचा ताबा भुसावळ नगरपालिकेकडे

    February 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.