फैजपूर, प्रतिनिधी I मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व मराठी पत्रकार दिनानिमित्त फैजपूर शहरातील व परिसरातील सर्व पत्रकार बांधवांचा खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन वतीने सत्कार करण्यात आला.
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यभरात साजरा करण्यात येत असलेल्या मराठी पत्रकार दिनानिमित्त फैजपूर येथे खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही पत्रकार बांधवांचा पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरूण होले, प्रा.उमाकांत पाटील, समीर तडवी, वासुदेव सरोदे, राजू तायडे, ललित फिरके, संजय सराफ, मयूर मेढे, फारुक शेख, सलीम पिंजारी, कामिल शेख, शाकीर मलिक, योगेश सोनवणे, राजू तडवी, कामील शेख, शेख शाकीर, मोहीननुद्दीन मामु यांच्यासह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.