Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»माजी मंत्री खडसे यांची जि.प.तील असमान निधीबाबत उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार
    जळगाव

    माजी मंत्री खडसे यांची जि.प.तील असमान निधीबाबत उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

    saimat teamBy saimat teamJanuary 7, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    एकनाथराव खडसेंनी ईडीच्या कारवाईबाबत मांडली बाजू
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी | येथील जिल्हा परिषदेतील पहिल्या फळीतील 10 ते 12 सर्वपक्षीय सदस्यांनी आपसात तब्बल 25 कोटी रूपयांचे कामे वाटून घेतली आहेत.यासंदर्भात राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या प्रा. डॉ. नीलम पाटील यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंकडे तक्रार केली होती. खडसेंनी गुरूवारी प्रा. डॉ. पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेवून तक्रार केली आहे.

    जिल्हा परिषदेतील पहिल्या फळीतील सर्वपक्षाचे सदस्य एकत्र आले आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या तब्बल 25 कोटी रूपयांचे कामांचे वाटप या सदस्यांनी आपसात केले आहे. अन्य सदस्यांच्या गटामध्ये किरकोळ कामे देण्यात आली आहेत. काही सदस्यांनी 1 कोटी रूपयांची कामे घेतली तर काही सदस्यांना केवळ 2 ते 3 लाखांचीच कामे मिळाली आहेत.

    असमान निधी वाटपाचे सूत्र गेल्या पाच वर्षापासून सुरू असून त्यात सर्वच पक्षांचे गटनेते आघाडीवर आहेत. गटनेते कामे मिळत असल्याने चुप्पी साधून आहेत. याच प्रकारातून राष्ट्रवादीच्या सदस्या प्रा. डॉ. नीलम पाटील यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंसोबत मुंबई गाठून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उपमुख्यमंत्री अजित पवार , ग्रामविकास विभागाच्या सचिवांची भेट घेवून हा प्रकार लक्षात आणून दिला. दरम्यान, याप्रकरणाची आता तातडीने चौकशी केली जाणार आहे.

    शुक्रवारी चौकशीचे पत्र निघणार यासंदर्भात तातडीने ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेची कामे आहे त्यात टप्प्यात थांबविली जाणार आहेत. या कामांची चौकशी करण्यासाठी शुक्रवारी ग्रामविकास विभागाच्या सचिवांकडून जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र काढले जाणार असल्याची माहिती प्रा. डॉ. नीलम पाटील यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Dharangaon : धरणगाव हादरले! विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला बेड्या.

    April 8, 2026

    उन्हाळी सुट्टीत एसटी प्रवास महाग; १० टक्के भाडेवाढ आणि स्वच्छता अधिभार लागू

    April 8, 2026

    Vande Bharat Food Controversy : वंदे भारतमधील जेवणात कीडा; प्रवाशाचा संताप, विक्रेत्यावर १० लाखांचा दंड

    April 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.