जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय तरुणाची धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची घटना आज २ जानेवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील भादली येथील ३५ वर्षीय तरूणाने रविवारी २ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीला आली आहे. नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील भादली येथील रहिवासी भागवत अशोक फेगडे (वय ३५, रा. भादली) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली येथील भागवत फेगडे हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बाहेर जाऊन येतो असे सांगून भादली रेल्वेस्थानक परिसरात धावत्या रेल्वेसमोर झोकुन देत आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणी नशिराबाद पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.