Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»शेतकऱ्याला मारहाणप्रकरणी ६ जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल
    क्राईम

    शेतकऱ्याला मारहाणप्रकरणी ६ जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल

    saimat teamBy saimat teamDecember 30, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । शेतकऱ्याची गाडी आडवून मारहाण करून त्यांच्याजवळून रोकड व सोन्याची चैन हिसकवून जबरी चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    केळीचे पैसे घेवून घरी परतणाऱ्या शेतकऱ्याची दुचाकी आडवून बेदम मारहाण करून खिश्यातील ५० हजारांची रोकडसह सोन्याची चैन आणि अंगठी जबरी हिसकावून चोरी केल्याचा प्रकार घडला होती. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती गंगाराम साळुंखे (वय-३७) रा. भादली खुर्द ता. जळगाव असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. निवृत्ती गंगाराम साळुंखे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेतकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतातील केळी तालुक्यातील किनोद येथील व्यापाऱ्याला विक्री केले होते. त्याचे पैसे घेण्यासाठी निवृत्ती साळुंखे हे दुचाकीने मंगळवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता किनोद येथे गेले होते. पैसे घेतल्यानंतर ते कठोरा गावाच्या मार्गाने भादली खूर्द येथे दुचाकी क्रमांक (एमएच १९ ७३६१) ने परतत होते. त्याच्यासोबत गावातील प्रकाश छबुलाल पाटील हे देखील होते. सायंकाळी सात वाजेच्या संशयित आरोपी सागर लक्ष्मण सपकाळे, दिक्षीत बळीराम सपकाळे, निलेश भगवान सपकाळे, जगदीश पुंडलिक सपकाळे, यशवंत गोकूळ सपकाळे, भूषण ज्ञानेश्वर पाटील रा. कठोरा ता. जि. जळगाव यांनी काहीही कारण नसतांना रस्ता आडविला. यातील एकाने लाकडी दांडा डोक्यावर टाकला. यात निवृत्ती हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

    दरम्यान बुधवारी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता निवृत्ती साळुंखे यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.