मुंबई, वृत्तसंस्था । ‘सरकार हरवले आहे’ असं प्रिंट असलेला कुर्ता घालून चाळीसगांव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आज सोमवारी विधानभवनात प्रवेश केला, सर्वांचे लक्ष वेधून घेत असलेल्या या कुर्त्यावर ‘ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना वीज, पूरग्रस्तांना मदत, mpsc नियुक्त्या, नोकर भरती भ्रष्टाचार व इतर मुद्दे प्रिंट केलेले असून या सर्वच मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असल्याचे त्यांनी माध्यमांसमोर सांगत हा लक्षवेधी कुर्ता परिधान करण्यामागे असलेली आपली भूमिका स्पष्ट केली.
मागच्या बाजूला ‘वसुली सरकार धिक्कार असो’ अश्या मोठ्या अक्षरात प्रिंट केलेल्या या कुर्त्यावर पुढच्या बाजूला
“शेतकरी वीज मागतोय,
MPSC उमेदवार नियुक्ती मागताहेत,
बेरोजगार पारदर्शकपणे नोकरी मागताहेत,
मराठा आरक्षण मागताहेत,
ओबीसी हक्क मागतोय,
पूरग्रस्त मदत मागतोय,
हे सर्व ज्यांनी दिल पाहिजे ते सरकार वसुली मागतय…
अश्या लिहिल्या ओळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.