जळगाव : प्रतिनिधी
अयोध्या येथे श्रीराम मंदिर निर्मितीस प्रारंभ झाला असून त्यासाठी देशभरात निधी संकलन अभियान सुरू झाले आहे. हे धर्म कार्य समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी आज शहरातील पांजरापोळ मध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले. हभप महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माऊली, योगी दत्तनाथजी महाराज, भगवान महाराज, देव गोपालशास्त्री, जितेंद्र महाराज, देवेंद्र भावसार, हरीेश मुंदडा यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या धर्म कार्यास व निधी संकलनास योगदान देण्याचे आवाहन यावेळी संत महात्म्यांनी केले.