Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»श्रीराम मंदिराच्या उभारणीत योगदान देण्याचे संत बालयोगी यांचे आवाहन
    चोपडा

    श्रीराम मंदिराच्या उभारणीत योगदान देण्याचे संत बालयोगी यांचे आवाहन

    saimat teamBy saimat teamJanuary 9, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा ः प्रतिनिधी
    सर्वांना सात्विक भावनेने मदत करण्याचे आवाहन प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थळी निर्माण होणार्‍या अद्भूत मंदिर उभारणीसाठी प्रत्येकाने मदत करावी, असे आवाहन महामंडलेश्वर संत बालयोगी महाराजांनी केले. चोपडा तालुका श्रीराम मंदीर निधी संकलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची नुकतीच भेट घेतली.यावेळी ते त्यांच्याशी बोलत होते.
    बालयोगी महाराज म्हणाले की, प्रत्येक जण प्रात:समयी प्रभू श्रीरामाचे स्मरण करुन दिवसाची सुरूवात करतो. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिर निर्माण कार्य सुरू होत आहे. श्रीरामाने आपल्या जीवनात अनेक सुखद क्षण दिले. आयुष्य जगण्याचा आनंद निर्माण केला आहे. आता आपल्याला प्रत्येकाला रामासाठी काही करण्याचा, देण्याचा योग आला आहे. जगातील प्रत्येक भाविकाला अयोध्येत येताना विशाल राममंदिर पाहिल्यानंतर अलौकिक समाधान मिळावे. यादृष्टीने सर्वांनी सात्विक भावनेने मदत करावी. दरम्यान, महामंडलेश्वर संत बालयोगी महाराजांच्या हस्ते गोपाळ पाटील, नरेंद्र पाटील व नंदलाल पाटील यांनी श्रीराम मंदिराचे उभारणीसाठीचे योगदान धनादेशाद्वारे प्रातिनिधीक स्वरुपात तालुका संघचालक डॉ.मनोज साळुंखे, तालुका कार्यवाह संदीप साळुंके यांच्याकडे सोपवले. यावेळी अनेक भाविकांनी राम मंदिरासाठी निधी सढळ हाताने दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक राजेश पाटील, तालुका सहकार्यवाह संदीप सूर्यवंशी, शहर कार्यवाह मनोज विसावे उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Heartbreaking Incident In Chopra : दोन महिन्यांच्या चिमुकलीचा हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू

    March 31, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.