Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»केमीस्ट संघटनेच्या मिळकतीसह पैशांवर मारला डल्ला
    जळगाव

    केमीस्ट संघटनेच्या मिळकतीसह पैशांवर मारला डल्ला

    saimat teamBy saimat teamJanuary 9, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    जळगाव डिस्ट्रिक्ट मेडिसिन डिलर्स असोसिएशनची निवडणूक पारदर्शी पद्धतीने न राबवता आपल्याकडे सत्ता कायम रहावी, या उद्देशाने न्यासाच्या मंजूर घटना व नियमावली विरुद्ध घेतली जात आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे व त्यांचे पदाधिकारी हे न्यासाचे लेखा परिक्षण अहवाल मंजुरी पूर्वी दिलेल्या दस्तांमध्ये मोठ्या रकमांचा विनियोग केव्हा, कोठे व कसा केला, याबाबत माहिती देत नाहीत.
    याविरोधात आपण खंडपीठात आव्हान दिले आहे. तर संघटनेच्या १९ जानेवारीला होणार्‍या सभेतील विषयांवर आपण हरकत घेतल्याची माहिती मेडिकल व्यावसायिक व असोसिएशनचे सदस्य दीपक जोशी यांनी पत्रपरिषदेत दिली.
    मेडिकल संघटनेचे पदाधिकारी सुनील भंगाळे व त्यांच्या कार्यकारी मंडळाचे ४ फेरफार अर्ज धर्मदाय उप आयुक्तांनी फेटाळले आहेत. त्या आदेशाविरुद्ध भंगाळे यांनी वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल केले असून त्याचे काम न्यायप्रविष्ट आहे. यासह बी. जे. मार्केटमधील मिळकत परस्पर कमी किंमतीत विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. ही मिळकत विक्री-पूर्वी न्यायालयाची परवानगी घेतली नाही. मिळकतीच्या पैशांची गैरमार्गाने विल्हेवाट लावून स्वत:चा आर्थिक लाभ ते करून घेत आहेत.यामुळे त्यांना संघटनेच्या कार्यकारी मंडळात राहण्याचा हक्क नसल्याचेही तक्रारदार दीपक जोशी यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, १९ रोजी वार्षिक सभेचे नियोजन केले आहे. यातील १३व्या विषयावर हरकत घेणार असल्याचे जोशी यांनी या वेळी सांगितले.
    त्यानंतरच निवडणूक प्रक्रिया राबवण्याची मागणी
    संघटनेच्या आर्थिक कारभाराची मागणी करूनही इतिवृत्त व अन्य माहिती पुरवली जात नाही. यामुळे न्यायालयात जावून माहिती मागितली आहे तर न्यासाच्या पैशांचा अपव्यय होत असल्याने व सभासदांच्या संमती विना ठराव पारित केले जात असल्याने या सभेबाबत स्वतंत्र लेखी हरकत घेणार असल्याचे जोशी म्हणाले. सुनील भंगाळे व कार्यकारी मंडळाने याचा खुलासा करावा, त्यानंतरच निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही दीपक जोशी यांनी या वेळी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.