फैजपूर ः प्रतिनिधी
मराठी पत्रकार दिनानिमित्त महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून फैजपूर येथील खान्देश नारीशक्ती गु्रप, दिपाली गु्रप, अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांच्या वतीने शहरातील सर्व पत्रकार बांधवांचा एक वर्षाचा अपघात विमा काढण्यात आला.
सायंकाळी सहा वाजता दिपाली गृप्स कार्यालयात छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण होले यांच्याहस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पत्रकार संजय सराफ यांनी मनोगत व्यक्त केले. दिपाली गु्रपतर्फे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन पत्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी प्रा.राजेंद्र तायडे, समीर तडवी, ‘साईमत’चे प्रा.उमाकांत पाटील, सलीम पिंजारी, पत्रकार संस्था अध्यक्ष फारुक शेख, संजय सराफ, इदु पिंजारी, राजू तडवी, नंदकुमार अग्रवाल, निलेश पाटील, संदीप पाटील, कामील शेख, मयुर मेढे, शाकीर मलिक, मुबारक तडवी, मुदस्सर नजर, जावेद काझी या पत्रकारांसह प्रेस फोटोग्राफर मिलिंद महाजन, वृत्तपत्र वितरक बंटी आंबेकर, देवेंद्र झोपे, दिव्यांग सेना अध्यक्ष नितीन
महाजन, दिव्यांग सेनेचे योगेश चौधरी, समाजसेवक अशोक भालेराव, हभप रेवा बाबा चौधरी, माजी नगरसेवक संजय रल इत्यादी उपस्थित होते. सुत्रसंचालन संदिप पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन दिपाली चौधरी झोपे यांनी केले.