साईमत न्यूज नेटवर्क –
जयपूर येथे शहीद स्मारकावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर मारहाणीची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनादरम्यान अचानक एका तरुणाने समोर येऊन अभिजित दिपके यांना कानशिलात मारली. त्यानंतर तो तरुण घटनास्थळावरून पळून गेला. काही प्रत्यक्षदर्शींनुसार, या वेळी परिसरात गोंधळ निर्माण झाला.
या घटनेनंतर अभिजित दिपके यांनी समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे.
नंतर समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
